(अतीक खान )मुक्ताईनगर
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडे केवळ पाच तासांचा कालावधी उरला असून या अल्प वेळेत मोठ्या संख्येने अर्ज कसे हाताळायचे, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहणार आहे.
नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतून १७ नगरसेवक निवडायचे आहेत. मागील सहा दिवसांत एकूण ६६ अर्ज दाखल झाले आहेत. यात
नगराध्यक्षपदासाठी : ६ अर्ज
नगरसेवक पदासाठी : ६० अर्ज
असे अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील ऑनलाइन तपासणीत आज सकाळपर्यंत १८७ अर्ज भरलेले दिसत आहेत, मात्र हे अर्ज अद्याप प्रशासनाकडे प्रत्यक्ष दाखल झालेले नाहीत. त्यामुळे हे सर्व अर्ज आजच दाखल होतील, अशी शक्यता आहे.
यामुळे अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाची मोठी धावपळ होणार असून कर्मचाऱ्यांवर ताण वाढणार आहे.

