संदीप जोगी मुक्ताईनगर……
सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या
उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आय.एस.ओ. (ISO) मान्यताप्राप्त , भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर. जि. जळगाव.
प्लेसमेंट सेल. यांच्या संयुक्त विद्यमाने आज 38 तरुणांनी भरती ठिकाणी उपस्थिती दिली आणि 30 मुलांचं सिलेक्शन झाले व कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.वंदना चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. अतुल वाकोडे सर व सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी. एफ. सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी. एफ. पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार आहे जे 15000/- ते 23000/-रु. पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रामध्ये मध्ये नौकरी दिली जाणार आहे,
ही भरती प्रक्रिया दि.10 नोव्हेंबर २०२५ ते 14 नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर.ता. मुक्ताईनगर. . जि. जळगाव येथे सुरू राहणार आहे. तरी 14 नोव्हेंबर पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन वं उप-प्राचार्य डॉ. संजीव साळवे यांनी केले आहें.
भरती साठी कागदपत्रे:
1)आधार कार्ड झेरॉक्स
2)10/12वी /ग्रॅज्युशन पैकी 1 झेरॉक्स.
3)पासपोर्ट साईझ 2 फोटो घेऊन येणे.

