मलकापूर प्रतिनिधी ।
मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नामनिर्देशन मागे घेण्याची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. नमुना ६ अन्वये एकूण पाच उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील उमेदवारांनी आज दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी आपली उमेदवारी अधिकृतरीत्या मागे घेतली आहे :
- शिला संजय वानखेडे, स्कूल ऑफ स्कॉलर जवळ, मुक्ताई नगर रोड, प्रभाग १-अ
- चांद अब्दुल जब्बार, आंबेडकर नगर, प्रभाग ४-अ
- दुर्गा राजकुमार वानखेडे, सुभाषचंद्र बोस नगर, प्रभाग ४-ब
- यास्मिन बी शेख सलीम, पांढरी प्लॉट, पार्पेठ, प्रभाग ६-अ
- शबाना बी मो. अकरम, कुरेश नगर, पार्पेठ, प्रभाग ६-अ
ही यादी निवडणूक कार्यालयातून अधिकृतरीत्या सहआयुक्त (नगर प्रशासन शाखा), जिल्हा कार्यालय बुलढाणा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत जाहीर झालेल्या या नावांमुळे संबंधित प्रभागांतील निवडणूक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले की, प्रक्रिया पूर्णतः नियमांनुसार पार पाडली असून प्राप्त माहितीप्रमाणे सर्व नोंदी पुढील टप्प्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत.

