मलकापूर: आशा वर्कर अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा दिल्याबद्दल शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहनपर भत्ता तत्काळ अदा करण्याबाबत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मलकापूर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. पी. पवार साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महाआयुष सर्वे करणे, कोविड-१९ संबंधित ईतर कामे” अहोरात्र मेहनत घेऊन जिवाची पर्वा न करता केल्याबाबत उजळणी करून दिली. त्या अनुषंगाने आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना मानधना व्यतिरिक्त कोरोना काळातील २३ महिन्यांसाठी दरमहा १०००/- रु. रक्कम प्रोत्साहनपर भत्ता “शासन परीपत्रक गा.वि.वि.क्र. चोविआ – २०२०/प्र/क्र.४२/वित्त-४ दि. ३१ मार्च २०२०” प्रमाणे देण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी यांना दिलेले होते.
तरी आजवर मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांना ग्रामपंचायत मार्फत प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला नाही. ग्रामपंचायत अधिकारी त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. कोणी तर चक्क लाच मागत आहे. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी दिपक पाटिल यांच्या कडे प्राप्त झाल्या बाबत देखील त्यांनी नमूद केले.
कोरोना काळात दिलेल्या सेवेचा मोबदला रक्कम रु.२३,०००/- प्रत्येकाला तत्काळ एका आठवड्यात वितरित करावा, अन्यथा शिवसेना मलकापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नंतरच्या परिणामास शासन जबाबदार राहील, असा ईशारा शिवसेने व्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे.

