(अतीक खान जळगांव)
डोंगरगाव ता. मालेगाव, जि. नाशिक येथे केवळ चार वर्षांच्या निरागस प्रज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण सुवर्णकार समाजात संतापाची लाट उसळली आहे. या हृदयद्रावक घटनेचा तीव्र निषेध नोंदवत तसेच गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार आणि भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्राताई किशोरशेठ वाघ यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले.
या भेटीमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रज्ञा दुसाने प्रकरणाचा सखोल तपास, दोषींना कठोर शिक्षा तसेच अशा घटनांचा पुनरुच्चार होऊ नये यासाठी शासनाने कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली.
या प्रसंगी अध्यक्ष श्री. संजय विसपुते, उपाध्यक्ष श्री. विजय वानखेडे, सचिव श्री. संजय पगार, सौ. सीमाताई सुरेश भोळे, अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ. रंजना वानखेडे, माजी नगरसेविका लताताई मोरे, मेळावा स्वागताध्यक्ष रमेशभाऊ वाघ, मेळावा प्रमुख सुभाष सोनार, नियोजन समिती प्रमुख शरदचंद्र रणधीर, श्री. भगवान दुसाने, सचिव प्रशांत विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
सुवर्णकार समाजाने एकजुटीने या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

