खून केल्यानंतर स्वतः फाशी घेऊन संपवला जीवन
प्रतिनिधी चिखली
चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे ता. चिखली या शांत गावात पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या गाढ झोपलेल्या आई-वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर कुन्हाडीने वार करून दोघांचा जागीच खून केला, त्यानंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.
मृतांमध्ये सुभाष दिगंबर डुकरे वय ६० वर्ष, लताबाई सुभाष डुकरे वय ५५ वर्ष, तर स्वतः आत्महत्या करणारा मुलगा विशाल सुभाष डुकरे वय ३५ वर्ष असे तिघेही एकाच कुटुंबातील आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल डुकरे हा काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेला होता. घटनेच्या रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. घरात झोपलेल्या आई वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर त्याने कुन्हाडीने वार करून दोघांना जागीच ठार केले. नंतर अपराधीपणातून किंवा नशेत असताना त्याने घरातच फाशी घेऊन जीवन संपवलं.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे अधिकारी
घटनास्थळी दाखल झाले. ठिकाणी पचनामा करण्यात आला
फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या पथकानेही तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेल नसून, दारूच्या व्यसनामुळे मानसिक असंतुलन निर्माण होऊन हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे. तर बातमी लिहीपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे कार्य पोलिसांकडन सरु होते.

