संदीप जोगी | मुक्ताईनगर
तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ. तराळ विद्यालयातील सन 1990 च्या बॅचच्या 22 वर्ग मित्र-मैत्रिणीचा तब्बल 35 वर्षांनी स्नेह मेळावा नुकताच बऱ्हाणपूर येथील एनएसीएल हॉटेलमध्ये नुकताच संपन्न झाला.
अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाच्या प्रांगणात सन 1990 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन शाळेच्या प्रगती विषयी हितगुज केले. त्यानंतर बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथील एनएसीएल हॉटेलमध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम मृत झालेल्या वर्ग मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वांनी स्वतः बद्दल व आपापल्या परीवारा विषयी माहिती दिली. वर्ग मित्रांमधील काही प्रगतशील शेतकरी,शिक्षक,प्राध्यापक,व्यावसायिक ,मोठे उद्योजक , इंजिनीयर, लोको पायलेट या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. स्नेह मेळाव्यात संगीत खुर्ची ,डान्स, गाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 35 वर्षांनी भेटत असलेली काही बालमित्र तर काही दहावीपर्यंत शिकणाऱ्या वर्ग मित्र-मैत्रिणींनी मनसोक्त सुखदुःखाच्या गप्पा मारून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. स्नेह भोजनानंतर स्नेह मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. दरवर्षी स्नेह मेळावा घेण्याचा निश्चय करण्यात आला तसेच वृक्षारोपण, सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेण्याचा प्रण यावेळी सर्व वर्ग मित्रांनी घेतला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापिका कल्पना बोरसे – हुरपडे अकोला तर संचालन व आभार विनायक वाडेकर यांनी केले.

