जळगाव ( अतीक खान)
अंतुर्ली फाटा ते बेलसवाडी मार्गावरील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष व नरवेलचे सरपंच मोहन महाजन तसेच स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन झुडपे तात्काळ कापण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
नरवेल फाटा ते भोकरी, धामंनदे, बेलखेड व पातोंडी या रस्त्यांवरही दोन्ही बाजूंना झुडपे व गवत वाढले असून त्यामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नाहीत. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः नरवेल फाट्याजवळ नावापुरते आठ ते दहा फूट झुडपे कापून केवळ देखावा केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे (कॉर्नर) असल्याने झाडे व झुडपांमुळे दृश्य आड येते. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून झुडपे त्वरित कापून रस्ता स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी सरपंच मोहन महाजन व नागरिकांनी केली आहे.

