Friday, November 21, 2025
Homenewsवंचित बहुजन आघाडी ची मुक्ताईनगर विधानसभा आढावा बैठक उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडी ची मुक्ताईनगर विधानसभा आढावा बैठक उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडी ची मुक्ताईनगर विधानसभा आढावा बैठक उत्साहात संपन्न
(अतिक खान मुक्ताईनगर)
आज दिनांक 30 आक्टोंबर 2025 रोजी प्रशिक नगर मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष : व बहुजन ह्रदय सम्राट,ॲड : श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ( साहेब )  यांच्या आदेशा नुसार तथा वंचित बहुजन आघाडीच्या विद्यमान जि : अध्यक्षा : मा : शमीभा ताई पाटील,यांच्या  सुचने नुसार,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात महत्वाची बैठक मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत, निवडणुकी साठी ता.अध्यक्ष : आयु : दिलीप डी : पोहेकर तसेच सह सचीव विश्वनाथ मोरे, त्याच प्रमाणे “अंतुर्ली” जि : परीषद एस : सी : या राखीव जागेचे आधिकृत उमेदवार व जेष्ट मार्गदर्शक : प्राध्यापक : आयु :  एस.एस .तायडे ( सर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक संदर्भात उमेदवारांची चाचपणी व मुलाखत, पदाधिकार्यांच्या निवडणूक संदर्भात सुचना, व माहिती जाणून घेऊन आर.एस.एस.प्रणीत बी.जे.पी.शिवसेना शिंदे गट,व राष्ट्रवादी अजित पवार गट सोडुन इतर सर्व पक्षांशी युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे.मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकी साठी वातावरण पोषक असुन घराणे शाही, हुकुमशाही , सरंजाम शाही असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकदीने लढणार व तीन ही गटात व सहा गणात उमेदवार उभे करुण भरघोष मतांनी निवडुन आनणार असा, आत्मविश्वास जिल्हा अध्यक्षा : मा :  शमीभा ताई पाटील,यांनी दिला.या प्रसंगी VBA चे तालुका उपाध्यक्ष, आयु : विठ्ठल भाऊ कोळी, VBA कोषाध्यक्ष वसंत दादा लहासे, VBA ता : महासचिव आयु : संजयजी  धुंदले ,VBA ता.प्रसिद्धी प्रमुख आयु :  संजय म्हसाने,संघटक रविंद्र चव्हाण, संजय माळी,सुनिल भिल्ल, गौतम धुंदले, महेंद्र शिरसाट, संतोष इंगळे, पंडीत महाले ,भागवत चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Viral News Live – Daily Newspaper Editor-in-Chief: Zafar Khan Athar Khan Registration Number: MHBIL/25/A1327
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments