मुक्ताईनगर प्रतिनिधी….
एरवी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन या सर्व जाती धर्माचे लोक आपापल्या धर्माचे सण उत्सव हे मोठ्या गुन्हा गोविंदाने आनंदाने साजरे करत असतात, मात्र आपल्या धर्माच्या पलीकडे जाऊन उत्सव व सण साजरे करणारे फारच क्वचित लोक असतात व ज्यांच्यामुळे सर्वधर्मसमभाव जागृत होऊन या देशाची एकता एकात्मता व अखंडता निर्माण होण्याचे कार्य घडते अशा लोकांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे.
अशीच प्रचिती आयुध निर्माणी वरणगाव येथे वैशाली पाटील यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवलेला होता त्यामध्ये आली.
या कार्यक्रमादरम्यान ज्या महिला अधिकारी यांना आमंत्रित केले होते त्यात हिंदूच नव्हे तर मुस्लिम अधिकारी महिलाचा देखील समावेश होता व त्यांनी सुद्धा अतिशय गुण्यागोविंदाने हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या उपस्थितीत पार पाडला. डब्ल्यू डब्ल्यू ए च्या एमआयएल युनिटच्या मीनल ओझा पुणे , अध्यक्षा रफतजहा सरवर वरणगाव फॅक्टरी ,करणी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सारिका ताई राजपूत या प्रमुख अतिथी म्हणून या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आयुध निर्माणी च्या अधिकारी वैशाली जितेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन महादेव मंदिरात केलेले होते.
याप्रसंगी कोणत्याही प्रकारचा धार्मिक भेद न पाळता रफत जहा यांनी स्वतः जागरूकपणे महिलांचे औक्षण केले. एवढेच नव्हे तर सर्वांना मार्गदर्शन देखील केले. या प्रसंगी अधिकारी वैशाली पाटील यांनी राबवलेल्या एकात्मतेच्या संकल्पनेची देखील त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना वैशाली पाटील यांनी सांगितले की, समाजात ग्रुप, भाषा, समाज, तालुका, जिल्हा ,राज्य स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणचे मोबाईलच्या माध्यमातून लोक जवळ आलेले असले तरी वास्तव मात्र वेगळेच असून प्रत्येक व्यक्ती एकमेकांपासून दूर गेलेला आहे. अशा प्रसंगी सर्वांनी एकत्रित येऊन आपले सण उत्सव साजरे करावे जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता ही टिकून राहते.
******
सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. तसेच विविध विभागाच्या महिला अधिकारी सुद्धा उपस्थित होत्या. मात्र रफत जहा यांच्या उपस्थितीमुळे धार्मिक सलोखा व सामाजिक एकतेचे दर्शन झाल्याने या कार्यक्रमाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.






