Top 5 This Week

Related Posts

साहब ये तो नकली है, असे शब्द देवस्थान परिसरात कानावर पडल्यास सावधान. नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये.. पोलिस निरीक्षकांचे आवाहन.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा परिसरातील लालगोटा , हलखेडा व इतर भागात बनावट नागमणी ,मांडुळाची तस्करी , जुने सुलेमानी पत्थर , तांब्याचे पुरातन भांडी, बनावट नोटा विक्रीच्या व्यवहारातुन उच्चशिक्षित लोकांची जबरीने लुटमार व मारहाण केल्याच्या घटना घडत असतात अशा भुलथापांना बळी पडु नये असे आवाहन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करूनही अशा घटना घडतच असतात . वर्षभरात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत .
कुर्‍हा परिसरातील लालगोटा , हलखेडा यासह अन्य जवळपासच्या गावांमधील महीला पुरूष मोठमोठ्या देवस्थानांच्या मंदीरांचे बाहेर माळा व मनीखडे विक्रीकरण्याचा व्यवसाय करतात . त्यांचेकडे एखादा उच्चभ्रु व्यक्ती नागमनी खडा घेण्यासाठी आला असता त्याला ते बोलण्यात अडकवुन साहब ये तो नकली है , असली नागमनी आपको हमारे गावको मिलेगा आप जल्द अमीर हो जावोगे असे सांगुन त्यांना कुर्‍हा भागातील गावाचा पत्ता दिला जातो .दोघ्ंमधील व्यवहार फिसकटला तर आलेल्या पार्टीकडील पैसे , मौल्यवान वस्तु , मोबाईल हिसकावुन घेवुन त्यांना भाला , कोयता , काठीने मारहाण करून हाकलुन लावल्याच्या घटना घडलेल्या आहेत . याला उच्चशिक्षीत व मोठ्या शहरातील लोकांना या भागात बोलवुन त्यांना नागमणी व मांडुळ , तांब्याच्या तारा, सुलेमानी पत्थर , बनावट नोटा देण्याचे बहाण्याने बोलावुन त्यांचेजवळुन लाखो रूपये घेवुन व त्यांचे अंगावरील महागड्या वस्तु जबरदस्तीने हिसकावुन व मारहाण करून हाकलुन लावल्याच्या घटना घडलेल्या आहेत .
यु ट्युब वर नंबर देवुन फसवणुक ….. आजच्या या संगणकीय युगात कुर्‍हा परिसरातील फसवणुक करणारी टोळी काही मागे नाही . झटपट श्रीमंतीच्या नादात काही व्यापारी , उच्चशिक्षीत मंडळी यु ट्युबच्या वर जावुन नागमणी , मांडुळ , सुलेमानी पत्थर, तांब्याच्या तारा, बनावट नोटा याची माहीती घेत असतात . यु ट्युबवर सर्च केल्यानंतर त्यावर संपर्कासाठी खाली भ्रमणध्वनी दिलेला असतो . त्या भ्रमणध्वनीवर काही बहाद्दर फोन लावतात. व आपली फसवणूक करून घेतात.

अंधश्रद्धेला बळी पडू नये.. पो. नि. आडसुळ

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील काही गावांमध्ये उच्चशिक्षित तसेच व्यापाऱ्यांना आमिष दाखवून बोलविले जाते याला बळी जात बहुतेकांचे येथे लुसल्याच्या घटना घडलेल्या आहेत. लोकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता व असे व्यवहार करू नये असे आवाहन मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी केलेले आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles