Top 5 This Week

Related Posts

संविधानाने प्रत्येकास न्याय,समानता व संधी देण्याची महान क्रांती – ऍड. देविदास काळे

मुक्ताईनगर — विविध जाती,धर्म,पंथ असलेल्या भारत देशातील प्रत्येकास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात सुंदर व सर्वात मोठ्या लिखित संविधानाने न्याय,समानता व संधी देण्याचे महान काम करून देशात क्रांती घडवून आणली असल्याचे प्रतिपादन ऍड. देविदास काळे यांनी मुक्ताईनगर येथे संविधान सन्मान साप्ताहच्या आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलतांना केले.अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे संविधान सन्मान सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुक्ताईनगर तालुका वकील संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे तालुकाध्यक्ष म्हणून ऍड.श्री.काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारी वकील ऍड. संतोष कलंत्री हे होते.

याप्रसंगी ऍड.उल्हास पाटील, ऍड. संतोष कोळी , ऍड. देवेंद्र बोदडे यांनीही भारतीय संविधान हा सर्वात श्रेष्ठ असा राष्ट्रग्रंथ असून प्रत्येकाच्या घरात संविधान असावे. तसेच भारतीय राज्यघटनेचे भागवत सप्ताहसारखे संविधान सन्मान सप्ताह सोहळे साजरे झाले पाहिजेत. असे सांगत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार थोर कायदेपंडित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय मिळवून देऊन देशात महान क्रांती घडवून आणली.प्रत्येक भरतीयावर बाबासाहेबांचे अनंत उपकार असल्याचेही या मनोगतात सांगण्यात आले.सदर संविधान सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ऍड. देविदास काळे यांनी सांगितले.याप्रसंगी प्रमोद भालेराव यांच्यासह तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद बोदडे यांनी केले. तर आभार ऍड. नीरज पाटील यांनी मानले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles