Top 5 This Week

Related Posts

संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र हरणे महाराजांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : ……..
आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख
ह.भ.प. रविंद्र हरणे महाराज यांचा श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान, श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात श्रीमंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने संत परंपरेतील दोन मान्यवर—पूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर व नाथ परंपरा अधिपती पूज्य मोहननाथ महाराज पैठणकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.

याच वेळी बारामती येथील ह.भ.प. अण्णासाहेब प्रमोद महाराज जगताप यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ह भ प हरणे महाराजांच्या एक्सष्ठी निमित्त विशेष सन्मान सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
या कार्यक्रमास संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, ह.भ.प. उदबोध महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. गुरु-शिष्य परंपरेच्या साक्षीने, वारी परंपरेच्या मंगल वातावरणात हा सन्मान सोहळा अत्यंत भावपूर्ण झाला.
पुरस्कार स्वीकारताना हरणे महाराज म्हणाले,
“हा पुरस्कार सर्वप्रथम आदिमाया शक्ती मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण करतो. हा माझ्या कार्याचा नसून सर्व मुक्ताई संस्थांवरील अध्यक्ष, विश्वस्त, तसेच सर्व वारकरी, माळकरी, फळकरी यांच्या सेवाभावाचा सन्मान आहे.”
मुक्ताई भक्तीपरंपरेला समर्पित आयुष्य जगणाऱ्या हरणे महाराजांचा हा सन्मान, संपूर्ण वारी परंपरेसाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles