२५ वर्षा पासून अखंड उपक्रम — देविदास शर्मा
स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री गुरू नानक देवजी जयंती व त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा निमित्ताने दोन दिवसीय दिं ४ व ५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्तिक शु १४ मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा भगवान श्री कृष्ण आणि तुळशी रूपातील रूक्मिणी माता यांचा शुभ विवाह पारंपरिक पद्धतीने मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे मुख मे हो राम नाम,राम सेवा हात मे हे ध्येय घेऊन सुरू आहेत या मध्ये आज त्रिपुरारी पोर्णिमा या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले म्हणून या पोर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पोर्णिमा असे म्हणतात या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात, शिवालयात, गंगेच्या तिरावर दिवे लावतात व दिपदान करावे, गंगा स्नान करावे आणि कार्तिक स्वामी चे दर्शन घ्यावे असा विधी आहे त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त दिं ५-११-२०२५ बुधवार रोजी सर्व प्रथम श्री सदगुरू एकनाथ महाराज.श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग.श्री गुरू नानक देव यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून श्री गुरूनानक देवजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली संध्याकाळी ६ वा ओंकारेश्वर मंदिर, मठ येथे देविदास शर्मा यांच्या हस्ते महाआरती करून भव्य-दिव्य दीपोत्सव ५००० दिवे लावुन साजरा करण्यात आला याप्रसंगी जेष्ठ लक्ष्मणराव गाडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा.विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे. सचिन केवारे.रमण अग्रवाल.प्रमोद सुरंगे.लालाजी सांगळे.किशोर अतकरे .सागर चुंबळकर,रामदास ढोले,पापा मुक्ते.राजु इंगळे,मोहन भोसले. गजानन निमकर्डे. विक्रांत माने. प्रविण डवले .शिवम ढोले.श्री गायकवाड.सुभाष भिल्लारे . अशोक आनंदे.विनोद चिमणकर .अशोक पऊळ. अशोक मोरे. मोहन भवर.जसबिरसिंग चव्हाण. जयंत घोगरे. अशोक काळे. भगत गुरूजी. निलेश इंगळे. प्रसाद पांडव. प्रकाश जोगदंड. राजु ढेरे.
आशाबाई अंधारे.जया सुकाळे,मुन्नी चव्हाण.
प्रमिलाबाई शिंदे,निर्मला भोसले.जान्हवी शर्मा,किर्ती शर्मा,जयश्री चिमणकर. शारदा नेमाडे,सुजाता शिंदे.सुनिता तायडे. सुमन गिरे.दुर्गा पवार. पुष्पा शिंदे. गायत्री शिंदे. कामिनी शिंदे.स्वरा अवचार. सई गरड. आराध्या ढोले. अनुष्का घट्टे.स्वप्नाली अवचार. पार्वती महाडिक. लक्ष्मी खरपाडे .उषा शर्मा.अनिता बोंन्द्रे.सुशिला आवलकर .बेबी आवलकर.तसेच शिवाजी नगर. सतिफैल भागातील शेकडो महिला पुरूषांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.





