संदीप जोगी…. मुक्ताईनगर….
- कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत
आ एकनाथराव खडसे यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथिल संत मुक्ताई मंदिर ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा असून
या मंदिराचे बांधकाम सुरू आहे परंतु गेल्या सात वर्षापासून एक रुपयाही निधी मिळाला नाही. मंदिर जिर्णोद्धाराचे काम व कळसाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे ताबडतोब निधी मंजूर करणार का असा प्रश्न शासनाला आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. तसेच पूर्वीचा 100 कोटीचा आराखडा पुनर्जीवित करावा अशी मागणी ही आमदार खडसे यांनी केली.
यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर देताना सांगितले की 25 ऑगस्ट 2014 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिरास तीर्थक्षेत्र ” ब ” दर्जा मिळाला होता. 2015 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्ष ते खाली 25 कोटीच्या कामांना तत्वता मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 15 कोटी रुपयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी पाठवला होता परंतु हा प्रस्ताव शासनाकडे थेट आल्याने वापस केला होता . हा प्रस्ताव पालकमंत्र्याच्या नियोजन समितीमार्फत जाणे अपेक्षित होते. आता 5 डिसेंबर 2025 रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने याला मान्यता दिलेली असून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे हा प्रस्ताव शिखर समितीकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल.
नऊ कोटीचे काम पूर्णत्वास गेलेले नसून याची शासन चौकशी करणार असून 15 कोटी रुपयाचा प्रस्ताव शिखर समितीकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल. तसेच शंभर कोटींचा आराखडा तपासून पाहणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.






