शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनासमोर मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासन झुकले; 50% करमाफीचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर

Advertisement

शिवसेना (उबाठा) च्या संवेदनशील आंदोलनामुळे सामान्य जनतेला मिळाला न्याय

मलकापुर:- शिवसेना (उबाठा)च्या 50% करमाफीसाठी डफडे बजाओ व आमरण उपोषणाच्या धास्तीने मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक झुकले असून आज दि.10 डिसेंबर रोजी मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन 50% करमाफीचा ठराव बहुमताने मंजूर झाला असल्याचे ग्रामसेवक दर्शन सुरळकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत थकीत कराची रक्कम एक रकमी भरल्यास त्याला 50% टक्के रक्कम सुट देण्याचा शासन निर्णय दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामविकास व पंचायत राज विभाग क.श्री.पोतदार उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढला आहे‌. शासन निर्णय काढून तब्बल एक महिना उलटला असून सुरळकर ग्रामसेवक महोदयांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असून त्याची संपण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 25 आहे. मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक प्रभाकर कानळजे व ग्रामसेवक दर्शन सुरळकर या योजनेपासून ग्रामस्थांना वंचित ठेवत असून ग्रामस्थांना घरकरामध्ये 50% ची सूट दिली नाही योजनेला 25 दिवसांचा अल्प कालावधी शिल्लक असून दि.04 डिसेंबर 25 रोजी शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) सेनेचे जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी पंचायत समिती नारखेडे यांना निवेदन देऊन मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील करदात्यांना तिन दिवसांत 50 टक्के सूट देऊन कर वसुली करण्यात यावी अन्यथा दि. 8 डिसेंबर 25 सोमवार रोजी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालय समोर डफडे बजाव आंदोलन करून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्याने दि. 8 डिसेंबर रोजी प्रशासक व ग्रामसेवक यांनी लेखी पत्र देत दि.10 डिसेंबर रोजी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत 50 टक्के करांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आज दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी अनिलसिंह (कान्हा) राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेला शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार,माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले,युवासेना शहर प्रमुख मंगेश सातव, शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह,माजी जि. प.सदस्य केदार ऐकडे, राजूभाऊ साठे, मिलिंद डवले, कुणाल राजपूत, संजय जामोदे,उमेश राऊत, ॲड. योगेश डवले, ॲड.सुवर्णा चोपडे, बंडू बोंबटकार, ललित बाठे, निलेश चोपडे पत्रकार,संजय बुडूकले, प्रमोद फिरके, पुरुषोत्तम बोंबटकर, दिनकर ठोसर सुमतीचंद संचेती सह मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत वासियांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सर्वानुमते शासनाने लागू केलेल्या निर्णयाप्रमाणे घर करांमध्ये 50% सूट देऊन थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामसभेत मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले व थकबाकीदारांनी तात्काळ ग्रामपंचायतची थकबाकी भरणे सुरू केले. शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सहपदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरचा निर्णय मार्गी लागला असून ग्रामस्थांनी शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांचे आभार मानले!

Advertisement
Subscribe to Viral News Live