Top 5 This Week

Related Posts

शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांसह घिर्णी ग्रामस्थांचे म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांसह घिर्णी ग्रामस्थांचे म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा यांचे दोन दिवसांत सबस्टेशनवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आश्वासन

मलकापुर:- घिर्णी ग्रामस्थांची रहिवाशी घरातील लाईट सकाळी 8 ते रात्री 10 असे 14-14 तास जात असल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.24 मार्च 26 रोजी कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा यांच्या कार्यालयासमोर शिवसेना(उबाठा)पदाधिकारी व घिर्णी येथील ग्रामस्थांनी सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.”घिर्णी येथील वाढीव लोडशेडींग बंद झालेच पाहिजे… असं कसं होतं नाही झाल्याशिवाय राहतं नाही “घोषणांनी परीसर दणाणून सोडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,घिर्णी येथील वाढीव लोडशेडिंग च्या नावाखाली भर उन्हाळ्यात गेल्या आठवडा भरापासून घरगुती लाईट सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यत 14-14 तास गुल असल्याने संतप्त ग्रामस्थांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने दि.20 मार्च 26 कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन तीन दिवसात घिर्णी येथील लाईन सुव्यवस्थित करा अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता, मात्र वसुलीत मश्गूल असणाऱ्या म.रा.वि.वि कंपनी प्रशासनाने घिर्णी ग्रामस्थांचा प्रश्न न सोडविल्याने आज संतप्त ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.ठिय्या आंदोलना दरम्यान कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा,आर.जी तायडे यांनी भ्रमणध्वनी वरून शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्याशी संपर्क साधून खामगाव येथून ट्रांसफार्मर आणून दोन दिवसात सब स्टेशन वर ट्रान्सफॉर्मर बसवून घिर्णी येथील ग्रामस्थांचा वाढीव लोड शेडिंगचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे आश्वासन दिले. या ठिय्या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे ,उपशहर प्रमुख शकील जमादार, शेतकरी संघटनेचे नेते दामोधर शर्मा, रणजीत डोसे,किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, उपतालुका प्रमुख गजानन मेहेंगे, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी,घिर्णी ग्रामपंचायत सदस्य संदीप चव्हाण,अक्षय चव्हाण, विनोद गव्हाळे, विश्वनाथ पुरकर,निखिल चव्हाण, वैभव राजपुत, गजानन चव्हाण, विष्णू गव्हाळे, महादेव बोपले, विनोद चोपडे, वसंता गव्हाळे, बाळू गव्हाळे, गोपाल चव्हाण, समाधान गव्हाळे,सत्तार शाह,चाॅद चव्हाण, दीपक संबारे, तुषार देशमुख, सुनील वानखेडे, महेंद्रसिंग गोहले, सुधाकर बगाडे, ज्ञानदेव इंगळे, निंबाजी सपकाळ, विनोद चोपडे जानराव सोनवणे, प्रल्हाद चोपडे, दिनकर गव्हाळे, शंकर गव्हाळे ,मंगलसिंग चव्हाण, कैलास पवार, प्रल्हाद भोपळे, विष्णू इंगळे, समाधान चोपडे, रामदास भोपळे, पांडुरंग भोपळे गजानन चोपडे, श्रीराम चोपडे, वसंता चोपडे, राजू महाजन, तुळशीराम चोपडे, गोपाळ राऊत, विष्णू गव्हाळे,गोपाल चव्हाण, गणेश सोनोने सह घिर्णी येथील ग्रामस्थांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles