मलकापुर:- न.प च्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
प्रभाग क्रं.9 (ब) चे उमेदवार सायमाबी शेख निज़ाम, तसेच
शहरातील सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दि.29 नोव्हेंबर 25 रोजी लकी लाॅन पारपेठ मलकापुर आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत व पक्ष प्रवक्त्या मा. जयश्रीताई शेळके यांनी मतदारांशी संवाद साधला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग 1अ) शितल संतोष बोरले, प्रभाग 3अ) गीता महादेव वनारे, प्रभाग 7 अ तस्कीनखान समीरखान, प्रभाग 7 ब शेख इम्रान शेख शब्बीर, प्रभाग 8 अ शरीफाबी खलीलशाह, प्रभाग 9 ब सायमाबी शेख निजाम या सर्व उमेदवारांचे मशाल निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरिदास गणबास, शिवसेना उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख सै. वसीम, वाहतूक सेना शहरप्रमुख शेख इम्रान लकी, विभाग प्रमुख सत्तार शाह, रफिक भाई बर्तनवाले,संतोष बोरले, समीर खान, महादेव वनारे, तसलीम भाई, हरीश भावनानी, यांच्यासह पंक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत !





