Top 5 This Week

Related Posts

शिवशाही बसमधील अपघातग्रस्त दाम्पत्यांना वाऱ्यावर सोडून कर्तव्यात कसूर करणाऱ्या बसचालक व वाहकास तात्काळ निलंबित करुन गंभीर जखमींना आर्थिक मदत देण्याची शिवसेनेची (उद्धव ठाकरे) मागणी

शिवशाही बसमधील अपघातग्रस्त दाम्पत्यांना वाऱ्यावर सोडून कर्तव्यात कसूर करणाऱ्या बसचालक व वाहकास तात्काळ निलंबित करुन गंभीर जखमींना आर्थिक मदत देण्याची शिवसेनेची (उद्धव ठाकरे) मागणी

दोन दिवसांत आर्थिक मदत न मिळाल्यास डेपोतून एक ही बस रस्त्यावर चालू न देण्याचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचा इशारा

मलकापुर:- मलकापूर येथून संभाजीनगर जाण्यासाठी दि. 20 जानेवारी 26 रोजी शिवशाही बस मध्ये शहरातील दुर्गा नगरातील रहिवासी रवींद्र तुकाराम नारखेडे व सौ.सीमा रवींद्र नारखेडे हे दाम्पत्य बसले बुलढाणा ते राजुर दरम्यान घाटात भरधाव निष्काळीपणाने बस चालकाने बस चालविल्याने ड्रायव्हरच्या पाठीमागील सीट वरील रवींद्र तुकाराम नारखेडे हे बसमध्ये खाली पडले त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची घटना दि.20 जानेवारी 26 रोजी पहाटे 6 वाजेदरम्यान घडली. आज दि. 23 जानेवारी 26 रोजी आगार व्यवस्थापक यांना शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या “त्या” बस चालक व वाहकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून जख्मी नारखेडेंना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील दुर्गा नगर परिसरात राहणारे नारखेडे दांपत्य हे संभाजीनगर ला जाण्यासाठी शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 3661 ने दि.20 जानेवारी 26 रोजी सकाळी साडेपाच वाजता निघाले होते. बस बुलढाणा – राजुर घाटा दरम्यान बस चालकाने गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अचानक ब्रेक दाबल्याने रवींद्र नारखेडे हे बस मधील सीट वरून खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व ते गंभीर जखमी झाले बस चालक वाहकाने जखमी रवींद्र नारखेडे यांना दवाखान्या बाहेर उतरवून देत त्यांच्याकडून तिकिटे परत घेऊन तिकिटाचे पैसे पत्नी सीमा नारखेडे यांचे परत देऊन दवाखान्याबाहेरुन पोबारा केला.चालक – वाहक या दोघांनी कर्तव्यात कसूर केला असून उपचारादरम्यान रवींद्र नारखेडे यांना डोक्याला जबर जखम झाली असून 30 ते 32 टाचे पडले आहे सदर अपघाताची माहिती ड्युटी नंबर 15 चे चालक एस.यु जायभाये, वाहक पी एस इंगळे यांनी बस आगाराला दिली नाही, अपघात होऊन चार दिवस उलटले असून अद्यापही एसटी महामंडळाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात साधी भेट घेऊन दखल सुद्धा घेतली नाही, कर्तव्यात कसूर करणाऱ्या चालक वाहकांना तात्काळ निलंबित करावे.अपघातातील जखमी रवींद्र नारखेडे याचेंवर मलकापुर येथील डाॅ.सुदीप देशपांडे यांच्या खाजगी रुग्णालयात अतीदक्षता (आय.सी.यु) मध्ये उपचार सुरू असून त्यांना तात्काळ एसटी महामंडळाने आर्थिक मदत द्यावी. दोन दिवसांत आर्थिक मदत न मिळाल्यास शिवसेना एकही बस रस्त्यावर चालू देणार नाही असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरीदास गणबास,जख्मी नारखेडे यांच्या पत्नी सौ.सिमा रवींद्र नारखेडे, अनुराग पाटील, शिवसेना नगरसेवक रफीकभाई बर्तनवाले,सहाय्यक वाहतूक निरीक्षक बि.डी.चव्हाण, प्रमोद आहेर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, युवा सेना शहर प्रमुख मंगेश सातव, उपशहर प्रमुख सागर पाटील,अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम,माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, किसान सेना किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेहंगे, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किशोर राऊत,उखर्डा तांदुळकर,विभाग प्रमुख सत्तार शाह, शाखाप्रमुख ईमामभाई, मोहसीनभाई, एजाज भाई,समीरखान युसुफ खान, इक्बालभाई, शाखाप्रमुख शेख नासीर भाई सह आदिंची उपस्थिती होती.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles