Top 5 This Week

Related Posts

शासनमान्य पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या कर्मयोद्धे दिनदर्शिका व वार्षिक अंकाचे चिखली येथे भव्य विमोचन

चिखली : Wasim sirIMG 20260126 WA0028
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या “शासनमान्य” शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या कर्मयोद्धे दिनदर्शिकाकर्मयोद्धे वार्षिक अंक यांचे भव्य विमोचन आज चिखली पंचायत समिती येथे बुलढाणा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर डॉ. श्रीमती रूपाली सरोदे (मानमोडे) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात झालेल्या रस्ता दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. सरोदे यांनी पुनर्नियुक्त आजी-माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, विधवा तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा समस्या असल्यास त्या माझ्या निदर्शनास आणाव्यात, त्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ठेंग, सचिव श्री केशव सोनुने, सहसचिव श्री राहुल गवई, कोषाध्यक्ष श्री रमेश जोहरे, चिखली तालुका अध्यक्ष श्री जय शिरसाठ, संग्रामपूर-जळगाव जामोद तालुका अध्यक्ष श्री विनोद वायझोडे, मुख्यमार्गदर्शक श्री हरिदास थोलबरे, जिल्हा महिला प्रमुख (वीरपत्नी) श्रीमती उज्वला कुळकर्णी, लोणार तालुका अध्यक्षा श्रीमती छाया साळवे यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, आजीवन सभासद व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Popular Articles