शहरे जगण्यालायक बनविली पाहिजेत” जोहरान ममदानी — न्यूयॉर्क महानगराचे नवे महापौर

Advertisement

लेखक : अतिक खान, विभागीय संपादक — जळगाव खान्देश

न्यूयॉर्कसारख्या जगप्रसिद्ध महानगरात राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

Advertisement

जोहरान ममदानी यांनी नुकताच न्यूयॉर्क महानगराच्या महापौरपदाचा विजय मिळवला — आणि त्यांचा संदेश स्पष्ट आहे :

“शहरे जगण्यालायक बनविली पाहिजेत!”

ममदानी यांनी निवडणुकीच्या प्रचारात आणि विजयावेळी मांडलेले विचार हे केवळ न्यूयॉर्कपुरते मर्यादित नाहीत, तर जगातील प्रत्येक शहरासाठी दिशादर्शक आहेत.

त्यांच्या राजकीय अजेंड्यातील काही ठळक मुद्दे :

सार्वजनिक वाहतूक आणि घरभाडे यावर नियंत्रण ठेवून ५०% कपात

सर्वसामान्यांसाठी सुलभ निवास योजना

कामकरी कुटुंबातील मुलांसाठी पाळणाघरे व शिक्षण व्यवस्था

पिण्याचे पाणी, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था यांना प्राथमिकता

या सर्व योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी श्रीमंतांवर योग्य कर

आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे युद्धविरोधी भूमिका!

ममदानी म्हणतात — “शहर म्हणजे फक्त इमारतींचा समूह नव्हे, तर त्या शहरात जगणाऱ्या लोकांच्या स्वप्नांचा थर आहे.”

त्यांनी विजय मिळवताना एक महत्त्वाचा उल्लेख केला —

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा.

त्यांच्या “धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सहिष्णुता” या तत्त्वांचा त्यांनी अंगीकार केला आहे.

द्वेष, वंशवाद आणि श्रीमंतांच्या वर्चस्वावर आधारित राजकारणाला त्यांनी ठामपणे नकार दिला.

स्वतःला “लोकशाही समाजवादी” म्हणवून घेत त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक न घालता आपल्या लोकहिताच्या विचारांनी विजय संपादन केला.

आज प्रत्येक महानगराला — मुंबई असो, दिल्ली, लंडन, पॅरिस, टोकियो अशाच लोकाभिमुख, मानवकेंद्री नेतृत्वाची गरज आहे.

न्यूयॉर्कसारख्या शहरात जर समानता आणि संवेदनशीलतेचं राजकारण उभं राहू शकतं,

तर जगभर आशावाद पुन्हा फुलू शकतो…

होय, आशावाद अजून जिवंत आहे!

ZohranMamdani NewYorkMayor लोकाभिमुखराजकारण शहरविकास

Subscribe to Viral News Live