रावेर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांचे अपसोय संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष

Oplus_16777216
Advertisement

रावेर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांचे अपसोय संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष,,, लेखणी शस्त्र रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळीरावेर ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक6 नोव्हेंबर या रोजी डॉक्टर पद्म्युन्न महाजन हे हजर असताना, तसेच सर्व नर्स, हजर असताना सुद्धा त्यांचे काम ग्रामीण रुग्णालय मधील शिपायांना करावे लागत आहेत. नियम व कायदे यांना धाब्यावर बसवून ग्रामीण रुग्णालय मध्ये यांचे मनमानी चालत आहेत. तसेच संबंधित रुग्ण यांना काही जखम झाली किंवा दुखापत झाली, तर त्या रुग्णांना ड्रेसिंग चे काम नर्स यांचे असते, परंतु तसे न होता, ड्रेसिंग चे काम ग्रामीण रुग्णालय मधील डॉक्टर व नर्स यांचे काम शिपायांना कोणताही अनुभव नसताना तसेच डॉक्टरची डिग्री नसताना करावे लागत आहेत. मग डॉक्टर M.S डॉक्टर यांचे काय काम आहे, असा सवाल संबंधित रुग्णांकडून बोलले जात आहेत, तसेच डॉक्टर पद्मिन महाजन यांना तसे विचारले असता, आमच्याकडे डॉक्टरांचा व नर्स यांचा स्टॉक कमी आहेत, त्यामुळे शिपाई यांना ड्रेसिंग चे काम करावे लागत आहेत, असे उत्तर दिले, परंतु शिपाई यांना कोणताही पूर्व अनुभव नसताना रुग्णाची ड्रेसिंग करणे चुकीचे आहे. तसेच रुग्णयांचे ड्रेसिंग करीत असताना, काही इन्फेक्शन बरे वाईट झाले तर, याला जबाबदार कोण राहील असा सवाल नागरिकांकडून बोलला जात आहेत. असे बऱ्याच दिवसापासून ग्रामीण रुग्णालय मध्ये चालत आहेत, त्यामुळे ग्रामीण रुग्णालय कडे आता तरी TMO, DHO यांनी त्वरित लक्ष घालावे, नाहीतर रुग्णांच्या काही बरे वाईट झाले तर, याला जबाबदार संबंधित वरिष्ठ अधिकारी असतील.

Subscribe to Viral News Live