Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न…

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..दि. २८ रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, तालुका विधी सेवा समिती मुक्ताईनगर आणि तालुका वकील संघ मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जयस्वाल लॉन्स, मुक्ताईनगर येथे विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.
या विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव श्री. एम. क्यू. एस. एम. शेख यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भुसावळ श्री. सुनील टी.सुर, श्री. पी. एच. बनसोड सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, प्रांत अधिकारी श्री.जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल बडगुजर, प्रमुख पाहुणे होते. तसेच मुक्ताईनगर येथील न्यायालयाचे न्यायाधीश श्री. बी.जी.पवार, मुक्ताईनगर तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री. ए.आर.कांडेलकर हे विचार मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती माननीय श्री.एम.क्यू.एस.एम.शेख यांनी विधी सेवा शिबिराचे प्रयोजन आणि विधी सेवा शिबिरांमार्फत जनजागृती व फायदे यावर यावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर श्री. एम.क्यू.एस.एम.शेख व श्री. एस.टी. सुर व संबंधित विभागाचे अधिकारी यांचेकडून तालुक्यातील विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या योजना, सेवांविषयीचे प्रमाणपत्र यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यामध्ये मुक्ताईनगर तालुका कृषी, पी.एम.सोनी योजना नगरपंचायत मुक्ताईनगर या योजनेमार्फत दिव्यांग प्रमाणपत्र, पंचायत समिती मुक्ताईनगर ५ टक्के दिव्यांग जि.प. स्तर योजना पूर्वसंमती दिलेले अर्जदार यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तहसील कार्यालय मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार गिरीश वखारे व मान्यवरांच्या हस्ते श्रावण बाळ योजना लाभार्थी प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव येथील न्यायाधीश साक्षी खरे, न्यायाधीश एम. व्ही. मोरे, व मुक्ताईनगर येथील ॲड.संतोष टी. कोळी यांनी केले. तसेच आभार मुक्ताईनगर न्यायालयाचे न्यायाधीश श्री. बी.जी.पवार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्ताईनगर तालुका वकील संघातर्फे मेहनत घेण्यात आली. कार्यक्रमास सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles