Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे रामरोटी आश्रमातर्फे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त प्रसादाचे वाटप.

मुक्ताईनगर प्रतिनिधी – शहरातील रामरोटी आश्रमा कडुन गजानन महाराज मंदिर येथे 61 किलो मोतीचूर लाडू व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर शहरात अखंड 19 वर्षांपासुन संत महापुरुषांच्या विचार कार्यांवर चालू असलेली मानवसेवा हिच ईश्वरसेवा हि सेवाभावी
वृत्तीजोपासत पपुगुरुवर्यसंत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावीट्रस्ट अंतर्गत रामरोटीआश्रमा व्दारा
संत गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर येथे सालाबादप्रमाणे 19 वे वर्षी सुद्धा संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रामरोटी आश्रमा व्दारे 65 किलो मोतीचूर लाडुंच्या प्रसादाचे वाटप दानदाते आश्रमाचे आधारस्तंभ डॉ एन जी मराठे ( गायत्री हॉस्पिटल), श्रीकांत पाटील मुक्ताई इलेक्ट्रिकल्स (51किलो लाडू), जी के महाजन (बॅंक), रामदास काठोके(पोस्ट मास्तर), यांच्या कडुन करण्यात आले.
श्री गजानन महाराज मंदिरात आमदार चंद्रकांत पाटिल यांची मुलगी प्रियंका चंद्रकांत पाटील व मुलगा हर्षराज पाटील यांच्या हस्ते महाआरती व पूजन झाले

कार्यक्रमास जेष्ठ नागरिक मंडळ मुक्ताईनगर, संत मुक्ताई महिला मंडळ, श्री संत गजानन महाराज मंदिर समिती आणि रामरोटी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून भक्तीमय वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles