Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे योगमाया प्रतिष्ठान यांच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आली भव्य निबंध लेखन स्पर्धा.

मुक्ताईनगर येथे योगमाया प्रतिष्ठान यांच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आली भव्य निबंध लेखन स्पर्धा.
“लेखन संस्कृती जपत केला शिव विचारांचा जागर”

मुक्ताईनगर प्रतिनिधी……. IMG 20260219 WA0033योगमाया प्रतिष्ठान, मुक्ताईनगर ही नोंदणीकृत सामाजिक संस्था असून, प्रतिष्ठानच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुक्ताईनगर शहर येथे भव्य निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांनी केलेला संघर्ष,स्वराज्याची निर्मिती, महाराजांचे लोककल्याणकारी नेतृत्व अशा सर्व बाबींचा अभ्यास चिंतन आणि लेखन व्हावे या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये शिव विचारांचे जागर व्हावे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता.
निबंध लेखन स्पर्धा ही मुक्ताईनगर येथील सहा केंद्रांवर झाली.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेचे सुरुवात करण्यात आली.
स्पर्धा ही गटनिहाय घेण्यात आली.
यात इयत्ता पाचवी ते आठवी – प्रथम गट
या गटातून एकूण 321 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

निबंध लेखनाचे विषय –
१.शिवराय माझे आवडते राजे
२.छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि जिजाऊंचे संस्कार
३.छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले संवर्धन काळाची गरज

इयत्ता नववी ते बारावी – द्वितीय गट
या गटातून 63 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

निबंध लेखनाचे विषय –
१.छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरण
२.आजच्या काळात शिव विचारांची गरज
३.भारतीय नौदलाचे जनक : छत्रपती शिवाजी महाराज

वरिष्ठ महाविद्यालय – तृतीय गट
या गटातून 29 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

निबंध लेखनाचे विषय

१.स्वराज्य ते सुराज्य : एक प्रवास
२.शिवराय : एक सर्वसमावेशक लोककल्याणकारी राजा
३.शिवरायांचे लष्करी व्यवस्थापन आणि गनिमी कावा

असे स्पर्धेचे विषय होते.
एकूण 405 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी योगमाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन सुरवाडे,संकेत कपले,मयूर पाटील,सनत जैन,प्रवीण राठोड,मनीष महाजन,तेजस सापधरे,
वैभव इंगळे,रूपेश कोळी,विश्वजित देशमुख, अनिल गवते आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles