मुक्ताईनगर येथे जवाहर नवोदयच्या परीक्षेसाठी स्व. निखिलभाऊ खडसे व जे.ई स्कूल येथे असे दोन केंद्र देण्यात आले होते. जे.ई. स्कूल येथे 455 तर स्व. निखिलभाऊ खडसे स्कूलमध्ये 444 असे एकूण 899 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.
जवाहर नवोदय ची परीक्षेसाठी शहरातील जी स्कूल व स्व.निखिल खडसे स्कूल हे दोन केंद्र होते. परीक्षा सकाळी साडे अकरा ते दीड वाजेच्या दरम्यान घेण्यात आली.जे. ई स्कूल मध्ये 480 विद्यार्थ्यांपैकी 455 विद्यार्थ्यांनी नवोदयची परीक्षा दिली यासाठी 20 ब्लॉक होते तर यासाठी 22 पर्यवेक्षकांची नियुक्त करण्यात आली होती. केंद्र संचालक म्हणून सुनील कोंगे यांनी काम पाहिले. तर स्वर्गीय निखिल भाऊ खडसे स्कूलमध्ये 475 पैकी 444 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाली होते. यासाठी 20 ब्लॉक तयार करण्यात आले होते यासाठी 22 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती .केंद्र संचालक म्हणून गजानन पाटील यांनी काम पाहिले. दोन्ही केंद्रांवर माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व गटशिक्षणाधिकारी वसंत मोरे यांनी भेट देऊन परीक्षेची पाहणी केली. परीक्षा सुरळीत करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पाटील ,ज्ञानेश्वर पाटील ,सरनाईक, जयस्वाल यांनी सहकार्य केले.




