मुक्ताईनगर येथे एकादशीनिमित्त रामरोटी आश्रमात पत्रकारांतर्फे फराळ वाटप

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी….संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर शहरात अखंड 18 वर्षांपासून संत महापुरुषांच्या विचार कार्यांवर चालू असलेली मानवसेवा हिच ईश्वर सेवा हि सेवाभावी वृत्ती जोपासलेली पपु गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रम येथे दर महिन्याच्या एकादशी वारीला भाविकांना फराळ वाटप करण्यात येत असते.
आज 14 जानेवारी रोजी षटतिला एकादशीला मुक्ताईनगर येथील पत्रकार बांधवांतर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. प्रसंगी रामरोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे , सचिव रामभाऊ टोंगे , किरण महाजन यांचेसह संचालक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Advertisement
Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here