संदीप जोगी…. मुक्ताईनगर _____
– मुक्ताईनगर येथील शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन चे काम पूर्ण करून शैक्षणीक वर्ष 2026पासून
प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आ.एकनाथराव खडसे य विधानपरिषदेत केली यावेळी ते म्हणाले अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे त्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन कुशल तंत्रज्ञ व्हावे या हेतूने मुक्ताईनगर येथे अल्पसंख्यांक समाजासाठी सन 2015 मध्ये शासकीय तंत्रनिकेतन मंजूर करण्यात आलेले आहे.
या तंत्रनिकेतनच्या इमारत बांधून तयार आहे मात्र गेल्या सहा वर्षात उर्वरित कामांसाठी एक रुपया सुद्धा निधी मिळाला नसल्याने निधी अभावी या तंत्रनिकेतनचे काम अपूर्णावस्थेत आहे प्रति शाखा साठ प्रवेश क्षमता असलेल्या तिन विद्या शाखा सुरू करण्यास येथे मान्यता मिळाली असुन अल्पसंख्यांक समाजातील प्रति वर्ष 180 कुशल पदविका धारक तंत्रज्ञ या तंत्रनिकेतन मधुन बाहेर पडतील परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे हे तंत्रनिकेतन सहा वर्षापासून इमारती पूर्ण असुन सुद्धा सुरू होऊ शकले नाही
तरी उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देऊन फर्निचर, मशिनरी व पद निर्मिती साठी निधी उपलब्ध करून देऊन शैक्षणीक वर्ष 2026पासुन या तंत्रनिकेतन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत केली





