(अतीक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर – नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ हा यंदा SC राखीव प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला असून या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून ॲडवोकेट चेतन भाऊ झनके यांनी आज लक्षवेधी शक्ती प्रदर्शन करत उत्साहात नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
ढोल-ताशांच्या निनादात, कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि विविध समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेले हे शक्ती प्रदर्शन शहरात चर्चेचा विषय ठरले. मुस्लिम, बौद्ध तसेच सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये झनके यांच्या उमेदवारीबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभागातील गेले काही वर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाय करण्याचा निर्धार व्यक्त करत चेतन झनके यांनी जनतेशी संवाद साधला.
प्रभागात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या, काही भागांतील अपूर्ण रस्ते, कामगार बांधवांच्या अडचणी, तसेच बौद्ध आणि मुस्लिम वस्त्यांतील प्रलंबित कामांवर तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नवीन चेहरा, नवीन दिशा आणि ‘सर्वसामान्यांचा आवाज’ म्हणून नागरिक ॲड. झनके यांच्याकडे पाहत असल्याचे नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्थानिक राजकीय वर्तुळातदेखील त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून, प्रभाग क्रमांक ८ मध्ये ते ताकदवान प्रतिस्पर्धी ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही राजकीय जाणकारांनी तर भरघोस मतांनी विजयाची शक्यताही नाकारलेली नाही.
प्रभागाच्या विकासगतीला चालना देणारा प्रभावी आणि निरसर व्यक्तिमत्व म्हणून ॲडवोकेट चेतन भाऊ झनके यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




