Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये सर्वसाधारण सभा संपन्न. …. मुक्ताईनगर येथील श्री नवनाथ बहुउद्देशीय सामाजिक सभागृह ठरावास मंजुरी.

मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये सर्वसाधारण सभा संपन्न.
…. मुक्ताईनगर येथील श्री नवनाथ बहुउद्देशीय सामाजिक सभागृह ठरावास मंजुरी.

मुक्ताईनगर प्रतिनिधी……
येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा 30 मार्च रोजी नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये नगराध्यक्षा संजना चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता संपन्न झाली. सभेमध्ये तब्बल 288 विषय ठेवण्यात आलेले होते पैकी 234 विषयांना मंजुरी मिळालेली असून उर्वरित विषयांना प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आलेली आहे.
मंजूर झालेल्या विषयांमध्ये मुक्ताईनगर येथील नाथ जोगी समाज बांधवांसाठी श्री नवनाथ बहुउद्देशीय सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ठरावाला पुनर्वसन मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. 30 मार्च सोमवारी सकाळी विधानसभेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे निवासस्थानी पत्रकार संदीप जोगी यांनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले आजच्या नगरपंचायत सर्वसाधारण सभेमध्ये जोगी समाजासाठी सभागृह ठराव मंजूर होईल असे सांगितले होते. प्रसंगी लक्ष्मणनाथ जोगी, मोतीलाल जोगी, संदीप जोगी, राकेश जोगी उपस्थित होते.
सभी प्रसंगी उपनगराध्यक्ष देवयानी निलेश शिरसाट, सर्व नगरसेवक,नगरसेविका , मुख्याधिकारी दीपक पुदाके, कार्यालयन अधीक्षक पंकज सूर्यवंशी, नगरपंचायतीचे कर्मचारी किशोर सैतवाल,सुनील चौधरी आदी उपस्थित होते.
सभेमध्ये मुक्ताईनगर शहरातील आठवडे बाजार व दैनिक बाजार लिलाव करण्यात आला. यामध्ये मक्तेदार मधुकर भिकनजी जाधव यांनी आठवडे बाजाराचा लिलाव 13 लाख 80 हजार व दैनिक बाजाराचा लिलाव सात लाख 86 हजार रुपयांमध्ये घेतलेला आहे. लीलाव प्रक्रियेमध्ये नऊ मक्तेदार यांनी सहभाग घेतला होता.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles