मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी देवयानी शिरसाट तर स्वीकृत नगरसेवकपदी छोटू भोई व नितीन ( बंटी) जैन यांची निवड

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे पदग्रहण 12 जानेवारी रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षा संजनाताई चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे. दुसऱ्या दिवशी 13 जानेवारी मंगळवार रोजी विशेष सभेत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व दोन स्वीकत सदस्यांची निवड प्रक्रिया नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये नगराध्यक्षा संजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


उपनगराध्यक्षपदी देवयानी निलेश शिरसाट यांची तर स्वीकृत नगरसेवक पदी छोटू भोई व नितीन (बंटी) जैन यांची निवड बहुमताने झाली असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश पुडके यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये निवड झालेल्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा, दोन स्वीकृत नगरसेवक तसेच सर्व नगरसेवक , नगरसेविका यांना शुभेच्छा दिल्या. फटाक्यांच्या आतिश बाजीत शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Advertisement
Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here