मुक्ताईनगर प्रतिनिधी….
येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार यांचे दालन व कर्मचारी यांचा बैठक हॉल यांचे नूतनीकरण करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती ( डी पी डी सी ) मधून 98 लाख रुपयांचा निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून याला लवकरच मान्यता मिळेल तसेच यामधून नवीन संगणक सुद्धा घेण्यात येणार आहे. तहसीलदार यांच्या दालनासह कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था यामुळे तहसील कार्यालय अद्यावत व आधुनिक होणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडे कर्मचारी देण्याची मागणी केली आहे.यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे उपस्थित होते.
मुक्ताईनगर तहसील कार्यालयाचे नूतनीकरणसाठी 98 लाखाचा प्रस्ताव. आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती.




