Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी दर बुधवारी रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू. … उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश राणे यांची माहिती.

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी दर बुधवारी रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू. … उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश राणे यांची माहिती.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…………: महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत राज्यात महिलांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दर बुधवारी रजोनिवृत्ती क्लिनिक ‘( मेनोपॉज क्लिनिक’ ) सुरू करण्यात आले असून हा उपक्रम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये सुरू झालेल्या या क्लिनिकला महिलांकडून प्रतिसाद मिळत आहे.

मेनोपॉजच्या काळात होणारे शारीरिक व मानसिक बदल लक्षात घेऊन या क्लिनिकच्या माध्यमातून तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक समुपदेशन, हॉर्मोन, हाडे व हृदय तपासणी तसेच औषधोपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिलांच्या आरोग्याबाबत राज्य शासनाने उचललेले पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

मुक्ताईनगर शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातही ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून जिल्हा शल्लचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी, बाह्य संपर्क जिल्हा अधिकारी डॉ. सुशांत सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे दर बुधवारी रजोनिवृत्ती क्लीनिक चालू करण्यात आलेले आहे .सदरहू क्लिनिक मध्ये स्त्री रोग तज्ञ डॉ.योगेश पाटील यांच्याकडून वैद्यकीय सल्ला समुपदेशन करण्यात येते तरी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांनी केलेले आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles