मुक्ताईनगर :-(प्रतिनिधी)
जळगाव जामोद येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे विटंबना करणारा जातीयवादी रवी लांडे नामक समाजकंटक हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला असून महामानवाच्या पुतळ्यावर अंडे फेकून द्वेष भावनेने विटंबना केलेली आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलेला असून जातीयवादी समाजकंटकाची धींड काढून आरोपीवर देशद्रोही अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी बौद्ध समाज बांधवांची एकमुखी मागणी आहे व अशा सामाजिक भावना भडकविणार्या आरोपीचा खरा सुत्रधार कोण तो कोणत्या कर्मट संघटनेशी संबंधित आहे का याची सखोल चौकशी पोलीसांनी करून कठोर कारवाई करावी व राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी सदर घटनेची त्वरित दखल घ्यावी असे निवेदन मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांनी तहसीलदार यांना दिले आहे. आणि तिर्व शब्दात निषेध व्यक्त केला आहे प्रसंगी सुधाकर बोदडे ,मोहन मेढे ,रवींद्र बोदडे, राजु बोदडे ,राजेंद्र वानखेडे, हरिषचंद्र ससाने, जगदेव इंगळे, प्रमोद भालेराव ,अनिल सोनवणे, संध्या हिरोळे आदी समाज बांधव उपस्थित होते.
मुक्ताईनगरला पुतळा विटंबना निषेधार्थ तहसीलदारांना समाज बांधवांचे निवेदन .





