(अतीक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे दाखल एफआयआर क्र. 345/2025, BNS 303(2) अन्वये नोंद असलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत इंदोर (मध्यप्रदेश) येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे
ताब्यात घेतलेले आरोपी :
- अन्वर अफजल हुसैन (21 वर्षे), रा. इंदोर
- शोएबअली करामत अली (22 वर्षे), रा. इंदोर आरोपींकडून प्रारंभी बजाज प्लॅटिना मोटारसायकल (किंमत 20,000 रुपये) क्रमांक MH 19 DM 4010 जप्त करण्यात आली.
नंतर न्यायालयीन पोलिस कस्टडीदरम्यान विश्वासात घेऊन करण्यात आलेल्या चौकशीत आरोपींनी मुक्ताईनगर परिसरासह इतर ठिकाणांहून आणखी चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल :
चौकशीनंतर पोलिसांनी खालील पाच मोटारसायकली जप्त केल्या—
सनावद, जिल्हा खरगोन (म.प्र.) येथून एक मोटारसायकल
हिरो कंपनीची Passion Pro, किंमत : ₹35,000
हिरो कंपनीची Splendor (बिना नंबर), किंमत : ₹30,000, इंदोर येथून
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतून दोन मोटारसायकली
एकूण जप्त मोटारसायकली : 5
अंदाजे एकूण किंमत : ₹1,50,000
तपास पथक व मार्गदर्शन
या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण व पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे करत आहेत.
कारवाईसाठी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले—
डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव
श्री. अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक
श्री. सुभाष ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी
श्री. आशिष आडसुळ, पोलिस निरीक्षक, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर पोलीसांच्या या कारवाईमुळे परिसरातील वाढत्या वाहन चोरी प्रकरणांना मोठा आळा बसणार आहे.





