Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगरमध्ये भीषण अपघात : ट्रॅव्हल्स आणि टँकरची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमीमुक्ताईनगर

(अतिक खान)मुक्ताईनगर तालुक्यातील बराणपूर रोडवरील स्मशानभूमी जवळ, महादेव मंदिरासमोर आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. अकोटवरून इंदोरकडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.या भीषण अपघातात टँकरमधील एक व्यक्ती जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, सुदैवाने ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असें की अकोट वरून इंदोर जाणारी प्रवासी वाहतुक करणारी ट्रॅव्हल क्र MP09FA9710 व इंदोर कडून मुक्ताईनगर कडे येणारे टँकर क्र mh46CU8154 सामोरा समोर धडकली .धडक इतकी जबर होती की टँकर चालक प्रमोद पटेल राहणार प्रमोद पटेल कुण्या खुर्द जिल्हा रिवा मध्य प्रदेश हा जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल चालक असिफ शहा राहणार इंदोर मध्येप्रदेश हा गंभीर जखमी झाला व ट्रॅव्हल मधील प्रवाशी किरकोळ जखमी झालेदोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीस उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles