Advertisement
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत स्थिर
मुक्ताईनगर प्रतिनिधी….
Advertisement
मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरु असतांना आज दि. 5 मार्च 2026 रोजी गुरुवारी हाऊस मध्ये कामकाज सुरु असताना मुक्ताईनगर मतदार संघांचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक खालावली असता तातडीने त्यांना एच.एन रिलायन्स हॉस्पिटल,मुंबई येथे दाखल केले.
यावेळी शिवसेनेचे नेते तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून एच.एन रिलायन्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी कळविले आहे.
Subscribe to Viral News Live





