माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे डोके फिरले असून त्यांनी डुकरा सारखी जमीन खाल्ली.
… आमदार चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल.
मुक्ताईनगर प्रतिनिधी….
भुसावळ तालुक्यातील मानपुर येथील गट नंबर 122 क्षेत्र 2.55 हेक्टर आर जमीन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खोटे आश्वासने व भूलथापा देऊन शेत जमीन साखर कारखाना उभारणीसाठी कुटुंबाच्या नावावर करून घेतली होती. मुळात ती महार वतन असलेली जमीन 1951- 52 पासून ती जमीन री ग्रेड झालेली असून ती खरेदी विक्री करता येत नसतानाही त्यांनी खरेदी केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.
जानेवारी 2002 मध्ये खरेदी झालेल्या जमिनीच्या खरेदी खतावर लिहून घेणार या ठिकाणी खाडाखोड केल्याचे दिसून येत असून त्या ठिकाणी आमदार खडसे यांची मुलगी शारदा खडसे यांचे नाव दिसून येते तर लिहून देणार आठ व्यक्ती असताना सूची क्रमांक दोन मध्ये लिहून देणार यामध्ये फक्त सात नावे दिसून येतात. भोसरी ते मानपूर पर्यंतची जमीन डुकरासारखी कोणी खाल्ली असा प्रश्नच आमदार पाटील यांनी आमदार खडसे यांना केला. संत मुक्ताई शुगर फॅक्टरीमध्ये रोहिणी खडसे व्हाईस चेअरमन होत्या. साखर कारखान्याचे आज कोणतही नामशेष राहिले नसून हजारो तरुण बेघर झालेले आहेत. संत मुक्ताई सहकारी सूतगिरणी त्यांनी भाडेतत्त्वावर दुसऱ्याकडे दिलेली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अजून त्यांचे दोन प्रकरणे बाहेर येतील असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पत्रकार परिषद प्रसंगी आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, माजी नगरसेवक पीयुष मोरे, गौरव दुटे उपस्थित होते.




