Top 5 This Week

Related Posts

महापरीनिर्वाण दिनानिमित्त वृद्धाश्रमात दिली मोफत आरोग्य सेवा निराधार वृद्धांच्या सेवेतुन महामानवास अभिवादन डॉ वैशाली जाधव

महापरीनिर्वाण दिनानिमित्त वृद्धाश्रमात दिली मोफत आरोग्य सेवा निराधार वृद्धांच्या सेवेतुन महामानवास अभिवादन डॉ वैशाली जाधव
महापरीनिर्वाण दिनानिमित्त वृद्धाश्रमात दिली मोफत आरोग्य सेवा निराधार वृद्धांच्या सेवेतुन महामानवास अभिवादन डॉ वैशाली जाधव 2

चिखली -: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त गिरजाई क्लिनिक चिखली व आय डी एफ सी (IDFC) फस्ट भारत लिमिटेड चिखली शाखा च्या वतीने मानवसेवा मल्टी पर्पज फाउंडेशन द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील निराधार बेघर वृद्धाची आरोग्य तपासणी व नेञ तपासणी शिबिर संपन्न
या कार्यक्रम चे अध्यक्ष मौजे भोकर येथील सरपंच गजानन फोलाने, प्रमुख उपस्थिती श्रीकिसन काळे, भोकरचे तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम फोलाने, उपसरपंच अनंता डोंगरदिवे,संदीप डोंगरदिवे,(IDFC Firs Bharat Limited) संतोष राजभोज(BM), योगेश तीडके (ABM) मीलिदं तेलगोटे (ABM) अक्षय खाणंडेकर*
सुरज चव्हाण हे होते.
शिबिरात गिरजाई क्लिनिक च्या डॉ वैशाली जाधव व छ. संभाजी नगरचे डॉ योगेश बधाळे यांच्या हस्ते सर्व तपासणी व उपचार मोफत करण्यात आले यात बीपी शुगर, रक्त लघवी, डोळे,तपासणी,चष्म्याचा नंबर काढुन चांगल्या प्रतीचे चष्मे वाटप केले तर गरजू वृद्धाना सलाईन इंजेकशन व प्रोटीनयुक्त अत्यावशक त्या गोळया औषधी देण्यात आले.
तसेच सर्व मान्यवारांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर निराधार बेघर वयोवृध्दा ची सेवा करून खऱ्या अर्थाने महामानवास अभिवादन करण्याची संधी मानवसेवा प्रकल्प ने करून दिली असे विचार डॉ वैशाली जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधार वृद्धासह भोकर गावातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रम चे संचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली डोंगरदिवे यांनी केले.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles