Top 5 This Week

Related Posts

मतदार जनजागृती काळाची गरज–तहसीलदार गिरीश वखारे

मुक्ताईनगर प्रतिनिधी….. येथील खडसे महाविद्यालयात 25 जानेवारी रोजी भारतीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी मतदार जनजागृती म्हणून रांगोळी स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी तहसीलदार गिरीश वखारे,नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांची उपस्थिती होती.
तहसीलदार गिरीश वखारे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्व विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीची ओळख करून दिली. व सर्व भारतीयांनी निस्वार्थ भावनेने कसल्याही प्रलोहनला बळी न पडता मतदान केले पाहिजे. तरच भारतीय लोकशाही अबाधित राहील असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एच. ए. महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून सर्व विद्यार्थ्यांना संदेश दिला की आपण भारतीय नागरिक आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या देशाविषयी एक निष्ठ असले पाहिजे, देशाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम असायलाच हवे तरच हा देश प्रबळ देशामध्ये गणला जाईल.

या या कार्यक्रमाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रवीण हेमराज राठोड, द्वितीय संकेत रामकृष्ण पाटील तर तृतीय कल्याणी विजय वडस्कर विजेत्या ठरल्या. तर दुसरी रांगोळी स्पर्धा यामध्ये अनेक विद्यार्थिनींनी भारतीय देशावरील लोकशाही वर आधारित असलेल्या रांगोळी तयार करून स्पर्धेत भाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक–प्रांजल प्रशांत खाचणे, द्वितीय–नेहा विनोद गायकवाड तर तृतीय–सानिका अशोक सोनार यांनी क्रमांक मिळवला.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles