Top 5 This Week

Related Posts

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे कुटुंबियांचे आमरण यशस्वी उपोषणाची सांगता

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे कुटुंबियांचे आमरण यशस्वी उपोषणाची सांगता काळेगाव (हरसोडा) येथील शेतकऱ्याच्या पारंपरिक रस्त्याचा मार्ग सुकर

मलकापुर:- तालुक्यातील मौजे काळेगाव (हरसोडा) येथील शेतकरी हरिदास देविदास शिंदे यांची शेती गट क्र. 63 आणि 65 ह्या शेतात जाण्याचा रस्ता शेतकरी संतोष कहाते यांच्या शेतीला लागून आहे परंतु संतोष कहाते यांनी पारंपरिक रस्ता उकरून त्याच्या शेतीचे क्षेत्रफळ वाढवून तार कंपाउंड करून रस्ता बंद केला होता.शेत रस्त्याकरीता हरिदास शिंदे यांनी तहसीलदार यांचे कडे प्रकरण दाखल करून न्यायाची मागणी केली होती. विभागातील मंडळ अधिकारी वानखेडे यांनी महसूल नकाशा ला बगल देऊन स्व हस्तलिखित नकाशा तयार करून खोटा अहवाल तहसीलदार यांच्या कोर्टात सादर केला होता ही बाब हरिदास शिंदे यांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर व शहरप्रमुख हरीदास गणबास यांच्या कडे अन्याय होत असल्याची बाब सांगितली, शिवसेनेच्या नेत्यांनी गांभीर्याने घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वात शिंदे कुटुंबियांचा शेतरस्ता व खोटा अहवाल सादर करणाऱ्या मंडळ अधिकारी वानखेडे याच्यावर कारवाई चे मागणीसाठी हरीदास देविदास शिंदे वय 60,सुनीता हरीदास शिंदे वय 55,गणेश हरीदास शिंदे वय 27, शंकर हरीदास शिंदे वय 33,अंजली गणेश शिंदे वय 21, या पाच जणांनी 11 महिन्याच्या बाळास समवेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि.25 जानेवारी 26 रोजी तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता आमरण उपोषण सुरु केले.तहसीलदार समाधान सोनवणे यांनी मूळ नकाशा व हस्तलिखित नकाशा चे अवलोकन केले असता त्यांच्या निदर्शनास आले की अहवाल व नकाशा चुकीचा आहे, त्या नंतर त्यांनी उपोषण मंडपाला मंडळ अधिकारी के.जी.राजपुत, गजानन खुळे, प्रशांत गवई, निलेश तायडे यांनी भेट देत तहसीलदार समाधान सोनवणे यांचे लेखी पत्र दिले, दि.11 फेब्रुवारी 26 रोजी फेर स्थळ निरीक्षण करून शासकीय नकाशा प्रमाणे तुम्हाला रस्ता मोकळा करून देण्याचे लेखी पत्र दिले. त्या नंतर उपोषणाची सांगता झाली.
उपोषणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर शेतकऱ्याचे व कुटूंबियांचे अश्रू अनावर झाले शेतकरी शिंदे कुटुंबियांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर व शहर प्रमुख हरीदास गणबास यांचे आभार मानले.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles