पोलिसांचे बैठे पथकाची नजर चुकवत अवैधरित्या गुटखा वाहतुकीच्या गाड्या सुसाट. _ चर्चांना उधान

Oplus_16777216
Advertisement

संदीप जोगी _ मुक्ताईनगर….

महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या व अवैधरित्या गुटखा विक्रीचे केंद्र असलेल्या मुक्ताईनगर शहरासह तालुक्याकडे पाहिले जाते. या काळामध्ये अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गुटखा करणाऱ्यांची व चांगलीच चांदी झाल्याचे दबक्या आवाजात चर्चा शहरांमध्ये सुरू आहेत.

Advertisement

मुक्ताईनगर नगरपंचायतीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपलेली असल्याने निवडणूक काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई चौक बोदवड रस्ता, पुर्णाड फाट्याजवळ, सालबर्डी फाट्याजवळ पोलिसांचे वाहन तपासणीसाठी पोलिसांचे बैठे पथक नियुक्त करण्यात आलेले होते.
मध्य प्रदेशातील इच्छापुर, बुऱ्हाणपूर येथून मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर शहरातून गुटख्याच्या गाड्या कोणालाही नकळत म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चुप यावरून पास होत असल्याचे गेल्या चार-पाच महिन्यामध्ये दिसून आलेले आहे.
आज रोजी मुक्ताईनगर शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याच्या चर्चा आहेत.
निवडणूक काळापुरता पोलिसांचे तपासणी बैठे पथक नियुक्त करण्यात आलेले होते. परंतु इच्छापुर बुऱ्हानपूर कडून मुक्ताईनगर मार्गे जळगाव ,छत्रपती संभाजीनगर मार्गाकडे जाणारे असंख्य सर्वांना ज्ञात असणारे छुपे रस्ते आहेत. निवडणूक काळात शामी शक्कल लढवत पोलिसांचे बैठे पथक यांची नजर चुकवत गुटखा वाहतूक करणारे याच मार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. निवडणूक काम प्रसंगी डी वाय एस पी सुभाष ढवळे व पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी योग्य नियोजन केले होते.

Subscribe to Viral News Live