पी. एम. श्री. जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र. २, मुक्ताईनगर येथील १५४ विद्यार्थ्यांची अजंठा लेणी येथे शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

Advertisement

मुक्ताईनगर | आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी पी. एम. श्री. जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र. २, मुक्ताईनगर येथील इयत्ता पहिली ते पाचवीतील एकूण १५४ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल ऐतिहासिक अजंठा लेणी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीन बसेसद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची, प्राचीन कला व संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा होता. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी अजंठा लेणींचे ऐतिहासिक महत्त्व, बौद्धकालीन संस्कृती, भित्तीचित्रे, शिल्पकला व स्थापत्यकलेचे बारकावे जवळून पाहून जाणून घेतले.

Advertisement

विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळावी, या दृष्टीने ही सहल अत्यंत ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध व आनंददायी ठरली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व कुतूहल या सहलीच्या यशाचे प्रतीक होते.

ही शैक्षणिक सहल शाळेचे मुख्याध्यापक श्री. रिजवान खान यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. सहलीच्या आयोजनात इरफान सर, मुसा सर, शरीफ सर, महफुजा मॅडम, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सर्व शिक्षक, कर्मचारी व पालकांच्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिस्त व नियोजन उत्कृष्टपणे सांभाळण्यात आले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असा विश्वास यावेळी पालकांनीं व शिक्षक वर्गांनीं व्यक्त केला

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here