Top 5 This Week

Related Posts

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ड्रग फ्री इंडिया : यूथ फॉर वेलनेस’ उपक्रमातून व्यसनमुक्त युवक घडविण्याचा निर्धार

मलकापूर : आजच्या आधुनिक युगात तरुण पिढी विविध तणाव, स्पर्धा व चुकीच्या सवयींमुळे व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे. याचे दुष्परिणाम वैयक्तिक आरोग्याबरोबरच कुटुंब व समाजावरही होत असून, यावर प्रभावी उपाय म्हणून जनजागृतीची नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जयंती) निमित्त पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे “ड्रग फ्री इंडिया : यूथ फॉर वेलनेस” या विषयावर भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (डी एल एस ए), बुलढाणा यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व व्यसनमुक्त जीवन या विषयावर डॉ. कुणाल शेवाळे, मानसोपचार तज्ञ आणि डॉ. सिद्धार्थ जाधव चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ हे मार्गदर्शन करतील. पोस्को कायद्याबाबत श्री. आर. बी. गिरी तदर्थ जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सरन्यायाधीश, मलकापूर आणि श्री. पी. बी. जाधव, अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश, मलकापूर हे मार्गदर्शन करतील. तसेच प्रमुख मार्गदर्शन श्री. आर. एन. रोकडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा यांचे राहणार आहे.

हा कार्यक्रम सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाकडून आयोजित करण्यात येत असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या सहकार्याने दि. 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न होणार आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. अमोघ मालोकार यांच्याकडून करण्यात येत असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे तसेच प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते आणि खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांनी या सामाजिक उपक्रमास प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमामध्ये युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगणे, तसेच सुदृढ आरोग्य, सकारात्मक विचारसरणी व शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणे, हा मुख्य उद्देश आहे. स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या युवकांसाठीच्या विचारांचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले असून, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून सक्षम, सशक्त व जबाबदार नागरिक घडावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles