नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर

Advertisement

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य , पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस शालेय क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालय मलकापूरच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झेप घेतली आहे. बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत शाळेतील 19 वर्षे वयोगट मुलींचे संघामध्ये द्वितीय क्रमांक कु. श्रावणी जोगदंड व कु.सोनल खर्चे या दोन्ही विद्यार्थिनींची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष श्री. डी. एन.पाटील,सचिव डॉ. श्री.अरविंद कोलते तसेच सर्व संचालक मंडळ,प्राचार्य ए. डी.बोरले , पर्यवेक्षक पी. एस. टेकाडे, क्रीडाशिक्षक डी.एस.राठोड तसेच
सर्व शिक्षकांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Subscribe to Viral News Live