नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलिसांची कारवाई — 9 अट्टल गुन्हेगार तडीपार

img 20251122 wa0023
img 20251122 wa0023
Advertisement

सैय्यद वसीम

चिखली शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी चिखली पोलिसांकडून कठोर कारवाई करत 1) गणेश गंगाराम चौधरी रा. संभाजीनगर चिखली 2) ऋषिकेश विजय हिवाळे रा. लुम्बीनी नगर चिखली 3) आनंद गुलाबराव अनपट रा. आनंद नगर चिखली 4) गोपाल रामा पाईकराव रा. एकता नगर चिखली 5) मो. परवेज मो. हनिफ रा गौरक्षणवाडी चिखलीतडीपार इसम यांना नोटीस
6) पंकज प्रल्हाद सुरडकर वय 25 वर्ष रा. गजानन नगर चिखली
7) शेख समीर उर्फ बाबा शेख कदीर वय 32 रा. भिमनगर चिखली
8) विजय राम गायकवाड वय 22 वर्ष रा. एकता नगर चिखली
9) समाधान उर्फ गोटया तोताराम बोराडे वय

Advertisement

वरील गुन्हेगारांविरुद्ध चिखली मारहाण, धमकी, चोरी, अवैध धंदे अशा स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्या उपस्थितीमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी तडीपार कारवाई प्रस्तावित केली होती. मा. उपविभागीय अधिकारी, चिखली यांनी सदर प्रस्तावावर विचार करुन संबंधित गुन्हेगारांना बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर 2 महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाईमुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व नागरिकांना सुरक्षित वातावरण लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले .

Subscribe to Viral News Live