धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न; विविध दाखले व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

0
4
धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न; विविध दाखले व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न; विविध दाखले व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
Advertisement

मलकापूर तालुक्यातील धरणगाव मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक अंतर्गत शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता धरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्राम महसूल अधिकारी जयश्री जेऊघाले यांनी प्रस्तावना सादर करत महसूल विभागाच्या कामकाजाबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली. तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शिबिराच्या उद्देश व उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश संचेती, तहसीलदार समाधान सोनवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी यश संचेती यांनीही शिबिराला संबोधित करत शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

Advertisement

शिबिरात सेतू विभागामार्फत विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. पुरवठा विभागाकडून दुय्यम व नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले तसेच संबंधित योजनांची माहिती देण्यात आली. निवडणूक विभागातर्फे सी. पी. पाटील यांनी एसआयआर संदर्भात माहिती दिली. शिक्षण विभागाची माहिती गटशिक्षणाधिकारी फाळके यांनी दिली. नायब तहसीलदार डॉ. चारुशिला चौधरी यांनी विविध प्रमाणपत्रे तसेच संजय गांधी निराधार योजनेबाबत मार्गदर्शन केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका कोलते यांनी अंगणवाडी सेवांबाबत माहिती दिली.

या शिबिरात मंडळातील एकूण 118 फेरफार निकाली काढण्यात आले. सातबारा उताऱ्यात 12 दुरुस्त्या करण्यात आल्या तसेच डिजिटल सातबारा उताऱ्यांचे 96 वितरण करण्यात आले. 8 अ उताऱ्यांची संख्या 58 असून विविध प्रकारची 105 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच एक खिडकी योजनेअंतर्गत 12 अर्जांची नोंद घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी सविता गायकवाड यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार राठोड, पी. पी. घोटकर, मंडळ अधिकारी व्ही. एन. कोल्हे, एस. के. वानखेडे, विजय बोराखेडे, संतोष पारस्कर तसेच ग्राम महसूल अधिकारी नितीन काळवाघे, ज्योती वानखेडे, जयश्री जेऊघाले, नितीन पांडव, कविता गायकवाड यांच्यासह महसूल सेवक विनोद नारखेडे, सतीश राठोड, अनिता गवई, सुनिता मु-हेकर, सचिन चोपडे, भगवान इंगळे, महसूल सहाय्यक वैशाली कुळकर्णी, शितल तोमर, जे. डी. पाटील आणि तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक संगिता पाटील उपस्थित होत्या. तसेच धरणगाव सामाजिक मंडळाचे अध्यक्ष विलास पाटील, रमेश झनके, गजानन इनके, अमित झनके, प्रमोद पाटील, उमाकांत चौधरी, ग्रामविकास अधिकारी झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here