त्या कामाची पत्राद्वारे माहिती मागवलेली आहे..
महावितरण चे उपविभागीय अभियंता यांची माहिती …… कामाचे अंदाजपत्रकाला मंजुरी नसताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर केले होते काम.
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):……….
महावितरणच्या कोथळी युनिट मधील हरताळे शिवारातील विद्युत वाहिनी शिफ्टिंग कामा च्या अंदाजपत्रकाला वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नसताना काही अधिकारी व ठेकेदाराने संगणमताने सदरचे काम पूर्ण केलेले असून याची चौकशी करण्याचे आदेश महावितरणचे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी उपविभागीय अभियंता श्री शुक्ला दिले होते. बेकायदेशीर झालेल्या त्या कामाची माहिती पत्राद्वारे कनिष्ठ अभियंता यांचे कडून मागवली असून त्यांना आता पुन्हा सोमवारी स्मरणपत्र देणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री शुक्ला यांनी सांगितले. याप्रकरणी दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई होणार असल्याचे महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी सांगितले.
महावितरणच्या नियमावलीनुसार अशा कामांसाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करून ते उपविभागीय, विभागीय आणि मंडळ स्तरावर मंजुरीसाठी पाठवणे अनिवार्य असते. मात्र,नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवत बेकायदेशीर पद्धतीने लाखो रुपयांचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून संपूर्ण प्रक्रिया डावलत काम आधीच पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही थेट कारवाई न करता त्यांना वाचवण्यासाठी “बॅकडेट प्लॅन” आखल्याची चर्चा विभागात रंगली आहे.
या सर्व प्रकरणामुळे संतप्त नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आता अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता या प्रकरणात वस्तुनिष्ठ कारवाई करणार की फक्त कागदी घोडे नाचवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



