मलकापुर:- तालुक्यातील विवरा येथील अतिवृष्टी धारकांना चार महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्याने तहसील कार्यालयात पाल ठोकून झिंगा बोंबील भुजो आंदोलनाचा इशारा शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख हरीदास गणबास सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिला होता.झिंगे-बोंबील भुजो आंदोलनाच्या धास्तीने तहसील प्रशासनाने दि. 17 डिसेंबर रोजी 67 जणांचे चार लाख 67 हजार रुपये तर आज दि.19 डिसेंबर 25 आंदोलनाच्या दिवशी 14 जणांचे एक लाख 40 हजार रुपये असे एकूण अंदाजे सहा लाख सात हजार रुपये अतिवृष्टी धारकांच्या खात्यात तहसील प्रशासनाने जमा केले व त्याबाबतचे लेखी पत्र शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टी धारकांना तहसील प्रशासनाने उशिरा का होईना शिवसेनेच्या आंदोलनाच्या धास्तीने त्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याने सदरचे आंदोलन तुर्तास स्थगित केले असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख हरिदास गणबास यांनी दिली आहे.



