(अतीक खान)जळगांव
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर बलात्कार करून डोका दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर पोलिस स्टेशन व तहसीलदार कार्यालयाला ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील यांनी सांगितले की,
तीला बोलताही येत नव्हतं अशा चिमुरडीवर २४ वर्षीय राक्षसी वृत्तीच्या नराधमाने बलात्कार करून निर्दयतेने हत्या केली. अशा घटनेला समाजात स्थान नाही. आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल.”
डोंगराळे हे विविध जाती-धर्माचे लोक एकत्र नांदणारे गाव असले तरी या क्रूर प्रकरणामुळे परिसरात तणाव व संतापाचे वातावरण पसरले आहे.
आज सादर केलेल्या निवेदनात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली.
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी :
जिल्हाध्यक्ष : लखन पानपाटील
उपजिल्हाध्यक्ष : अजय शेलार
जिल्हा सचिव : सागर बावसकर
शहराध्यक्ष : प्रथमेश भास्कर
सोशल मीडिया प्रमुख : समीर गाढे
आदित्य गजरे
श्रावण भालेराव
राहुल पानपाटील
अतुल भाऊ
दीपक गाढे
सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





